Thursday 5 December 2019

*डॉ ऋता कदम*....*शेवटचा निरोप समारंभ*

आज आयुष्यात पहिल्यांदाच
तिला इतका मानपान मिळाला
असा मानपान मिळण्यासाठी
 तिने पुनः जन्मा यावे
असा विचार क्षणभर डोकावला...

आज तिच्या घरी सर्वच आले
माहेरचे, सासरचे, मानाचे 
अन पानाचे
तिने नाही कुणाच्या 
पायाला हात लावला
तरी कुणालाच तिचा 
राग नाही आला...
खरचं आज तिचा 
पाहुणचार वेगळाच झाला
खरचं हा शेवटचा निरोप
 समारंभ थाटात पार पडला...

ती आज पहाटे उठली नाही
म्हणून कुणीच तिला 
हटकले नाही
उशिरा का असेना तिने उठावे
सगळ्यांनीच तिच्या विनवण्या केल्या
खरचं आयुष्यात असा क्षण
 पहिल्यांदा आला
हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला...

नेहमीच आटप म्हणून
 कटकट करणारा नवरा
आज स्वतःच तिची 
तयारी करायला लागला
तिने त्याचं आज्ञा पालन
 नाही केलं
तरी साश्रू प्रेमाने तिला 
भिजवू लागला
खरचं आयुष्यात पहिल्यांदाच
नवऱ्याच्या मनाचा ठाव लागला
हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला...

तिची नवी साडी नेहमीच
 हसण्याचा विषय झाला
आज सर्वांनी तिला 
पैठणीचा आहेर दिला
खणखणत्या बांगड्यांचा
 चुडा भरला
तरी आज कुणाच्या डोळ्यात
 उपहास नाही दिसला
खरचं आयुष्यात पहिल्यांदा
 तिच्या सौंदर्याचा गौरव झाला
खरचं हा शेवटचा समारंभ थाटात पार पडला...
आज तिच्या डोळ्यात
 स्मित हास्य
दुसऱ्यांच्या डोळ्यात मात्
र आसवांचं रहस्य
तिचे हात कुणाचे 
अश्रू नाही पुसायला गेला
तरी प्रत्येकजण तिच्यासाठी हळहळला
खरचं आयुष्यात पहिल्यांदाच
 जग तिच्यासाठी रडला
हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला...
आज तिला कुणाचीच
 पर्वा नव्हती
सगळ्या बंधनातून ती मुक्त होती
आक्रोश करून पुनः तिला
बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला
आज पहिल्यांदा जगाला
 तिचा मोह झाला
खरचं हा शेवटचा  निरोप 
 समारंभ थाटात पार पडला...
जीवंतपणी नेहमीच तिच्यावर
 जबाबदारी राहिली
थोडीशी चुकली तर 
तिला धारेवर धरली
आज सर्व त्यागून ती 
निर्धास्त झाली
तरी गुलाबाची शेज सजवून
 सर्वांनी तिची कदर केली
आज पहिल्यांदा
 काट्याशिवाय गुलाब तिच्या
 वाट्याला आला
खरचं हा शेवटचा समारंभ
 थाटात पार पडला...
आज प्रत्येकाने तिचा
 सोहळा पाहिला
बाकी ती शांत होती 
तिला पाठवणारा प्रत्येकजण रडला
घरचाही रडला,दारचाही रडला 
पाठचाही रडला,पोटचाही रडला
लहानही रडला,मोठाही रडला
जेव्हा नवऱ्याने हंबरडा फोडला 
मुलांनी एकच गलका केला
तेव्हा तिच्या स्त्रीपणाला 
खरा अर्थ प्राप्त झाला...
खरचं हा शेवटचा निरोप
 समारंभ थाटात पार पडला...
आपल्या सर्व मित्र परिवारातर्फे  भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐💐💐
😔😔

Wednesday 27 February 2019

Vipassana

Vipassana means to see things as they really are, is one of India's most ancient techniques of meditation. 
Vipassana is a way of self-transformation through self-observation. It focuses on the deep interconnection between mind and body, which can be experienced directly by disciplined attention to the physical sensations that form the life of the body, and that continuously interconnect and condition the life of the mind. It is this observation-based, self-exploratory journey to the common root of mind and body that dissolves mental impurity, resulting in a balanced mind full of love and compassion.
The scientific laws that operate one's thoughts, feelings, judgements and sensations become clear. Through direct experience, the nature of how one grows or regresses, how one produces suffering or frees oneself from suffering is understood. Life becomes characterized by increased awareness, non-delusion, self-control and peace.